Cocaine Smuggling in Vagina: 24 वर्षीय मॉडेलचा योनीमध्ये लपवलेल्या कंडोममधून ड्रग्जच्या तस्करीचा प्रयत्न; 'अशी' झाली पोलखोल
Grace Athanatos (संग्रहित संपादित प्रतिमा)

अंमली पदार्थांच्या (Drugs) तस्करी संबंधी अनेक बातम्या आपण दररोज ऐकत असतो. ड्रग्जच्या देवाण-घेवाणीसाठी लोकं ज्या काही युक्त्या वापरतात ते पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही अक्षरशः कपाळावर हात मारून घ्याल. सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे एका संगीत महोत्सवात 5.6 ग्रॅम कोकेन घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ओन्ली फॅन्स मॉडेल (Onlyfans Model) ग्रेस अथानाटोसला (Grace Athanatos) पकडण्यात आले आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तिने तिच्या योनीमध्ये लपवलेल्या कंडोममध्ये ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केला.

ग्रेस अथेनाटोस ही 24 वर्षांची आहे आणि तिचा जन्म मेलबर्नमध्ये झाला आहे.  सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये 14 मे रोजी झालेल्या डीजे मारलो कॉन्सर्टमध्ये तिने आपल्या योनीमधून ड्रग्ज घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ड्रग स्निफिंग कुत्र्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सावध केल्यानंतर तिला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, ग्रेस अथानाटोस कॉन्सर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत उभी असताना, ड्रग स्निफिंग कुत्र्यांनी तिच्यावर भुंकायला सुरुवात केली, त्यानंतर तिची तपासणी केली असता तिच्याकडे ड्रग्ज आढळून आले.

तिची चौकशी सुरू झाली तेव्हा ग्रेसने कबूल केले की ती आपल्या मित्रांसाठी काही कोकेन आत घेऊन जात होती. आपण हे फक्त आपल्या मित्रांसाठी केले, असे तिने सांगितले. यासाठी तिने साधारण 16 हजार रुपये खर्च केले होते. त्यानंतर अथेनाटोसला या आठवड्यात स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे तिच्यावर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप ठेवला, परंतु हे ड्रग्ज व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी असल्याने तिच्यावरील औपचारिक दोषारोप टाळले गेले आणि त्याऐवजी तीला 12 महिन्यांचा सशर्त वर्तन बाँड देण्यात आला. (हेही वाचा: Mumbai-Howrah Mail मध्ये 2 किलो सोन्यासह 100 किलो चांदी सापडली, पोलिसांनाही बसला धक्का)

आपली मोठी शिक्षा टाळली गेल्याने मॉडेलने तिच्या कायदेशीर टीमचे आभार मानले आहेत. याबाबत बोलताना तिने सांगितले की, ‘मी याआधी अशा कोणत्याही भानगडीमध्ये अडकवले नाही. अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली व त्यामुळे मी खूप घाबरले.’ यानंतर अनेक माध्यमांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावर आपण जणू काही ‘पॅरिस हिल्टन’ सारखी सेलेब असल्याचा भास होत असल्याचे ती म्हणते.