Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

Christmas Parade Accident:  अमेरिकेतील विस्कॉन्सिन मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस परेडच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या कारने 20 हून अधिक जणांना उडवले. यामध्ये काही मुलांचा सुद्धा समावेश असून ते जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परेड दरम्यान एक लाल रंगाची कार अचानक आली आणि तिने गर्दीला चिरडत पुढे गेली. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

शहराचे प्रमुख पोलीस डॅन थॉम्पसन यांनी असे सांगितले की, वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. जखमी झालेल्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचसोबत नागरिकांनी घटनास्थळी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. त्यात कार ही गर्दीला उडवत पुढे जात असल्याचे दिसून येत आहे.(Afghanistan: प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण केल्यानंतर हत्या, भररस्त्याच फेकला मृतदेह)

Tweet:

दरम्यान, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. अधिकारी घटनेसंबंधित अधिक माहिती घेत आहेत. अमेरिकेच्या वेळेनुसार ही घटना संध्याकाळी 4.30 वाजता घडली. त्यावेळी वोकेश मध्ये मिल्वौकी येथे मोठ्या संख्येने नागरिक ख्रिसमस परेड करण्यासाठी एकत्रित आले होते.