Afghanistan: प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण केल्यानंतर हत्या, भररस्त्याच फेकला मृतदेह
Death (Photo Credits-Facebook)

Afghanistan: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर सुद्धा तेथे परिस्थिती अद्याप सुधारली नाही आहे. उत्तर अफगाणिस्तान मधील एका प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद नादर अलेमी असे डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे दोन महिन्यापूर्वी मजार-ए-शरीफ शहरातून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी पैसे सुद्धा मागितले. पैसे देऊन ही त्यांची हत्या करण्यात आली. डॉक्टरचा मुलगा रोहीन अलेमी याने ही माहिती दिली आहे.

डॉक्टरांच्या मुलाच्या मते, अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी मोठी रक्कम मागितली होती. अखेर परिवारातील सदस्यांनी त्यांना 350,000 डॉलर देण्यासाठी होकार दिला. सुरुवातीला यापेक्षा ही अधिक रक्कम मागितली गेली. परंतु पैसे देऊन सुद्धा त्यांची हत्या केली. ऐवढेच नव्हे तर त्यांचा मृतदेह भररस्त्याच फेकून दिला.(US: म्युजिक फेस्टिव्हलमध्ये स्टेजच्या जवळ जाण्यासाठी प्रेक्षकांची एकमेकांना धक्काबुक्की, 8 जणांचा मृत्यू)

रोहीन अलेमी याने म्हटले की, माझ्या वडिलांवर खूप अत्याचार झाला. त्याच्या शरीरावर जखमा आहेत. व्यवसायाने अलेमी यांनी मजार-ए-शरीफ येथील सरकारी प्रांतीय रुग्णालयात काम केले. त्यांच्याकडे खाजगी दवाखाना देखील होता. जे शहरातील पहिले खाजगी मनोरुग्णालय असल्याचे सांगितले जात होते.

तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी सांगितले की तालिबानी सैन्याने मजार-ए-शरीफजवळील बल्ख प्रांतात अलेमीसह तीन लोकांच्या अपहरणामागे आठ संशयित अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ते म्हणाले की अपहरण केलेल्यांपैकी दोघांची सुटका करण्यात आली होती, परंतु अलेमीची आधीच हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत, ज्यांनी डॉक्टरची हत्या केली असावी.

दरम्यान, तालिबान संचालित अर्थ मंत्रालयाने घोषित केले की सर्व सरकारी कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल, जे तालिबानने ताब्यात घेतल्यापासून दिलेले नव्हते. अफगाणिस्तानात ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा अभाव हे गरीबी वाढवण्याचे एक कारण आहे.