Chinese COVID-19 Vaccine चे मानवी शरीरावरील चाचणीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष दिलासादायक असल्याचा दावा
Coronavirus | Representational, Edited Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील Moderna कंपनी पाठोपाठ आता चीनमध्येही कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या लसीला यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून संरक्षण होऊ शकते असे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. The New York Times ने दिलेल्या माहितीनुसार, The Lancet या युके मधील मेडिकल जर्नलमध्ये शुक्रवार (22 मे) दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, चीनमधील कोरोना विरूद्धची लस सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करणारी आहे. Moderna Coronavirus Vaccine: अमेरिकेमध्ये मानवी चाचणीचे सुरूवातीच्या टप्प्यातील निष्कर्ष दिलासादायक असल्याचा कंपनीचा दावा.  

दरम्यान चीनमध्ये दावा करण्यात आलेली ही लस 18-60 वर्षातील 108 जणांना दिली होती. त्याच्या फेझ 1 ट्रायलचे मानवी चाचणीचे निकाल समाधानकारक आहेत. आता ते ऑनलाईन देखील जाहीर करण्यात आले आहेत. सध्या जगभरात 52 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी 3 लाखापेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान आता कोरोनाचा जगभर सुरू असलेला धुमाकूळ रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चीनमधील ही लस Ad5-nCoV अशी क्लासिफाईड करण्यात आली आहे. दरम्यान ही लस शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला विषाणू विरूद्ध लढण्यासाठी तयार करते. दरम्यान लस दिल्यानंतर 28 दिवसांमध्ये कोणतीही गंभीर रिअ‍ॅक्शन झाल्याचं समोर आलेले नाही. त्यामुळे मानवी शरीरावर ती सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच SARS-CoV-2 या कोव्हिडच्या विषाणूविरूद्ध देखील 28 दिवसांमध्ये अ‍ॅन्टिबॉडिज निर्माण करण्यात मदत होत असल्याचं सांगण्यात आले आहे.

चीनमध्ये Academy of Military Medical Sciences and a member of the Chinese Academy of Engineering चे बायोलॉजी प्रोफेसर Chen Wei यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम या व्हॅक्सिनची ट्रायल करत आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये सुमारे 508 जणांवर या लसीची चाचणी घेतली जाणार आहे.