China Flag (Photo Credits-Twitter)

भारत-चीन सीमेवर जून महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणाव होता. त्यामध्येच हिंसक झडप देखील झाली होती. पण चीन कडून त्यावेळेस चीनी सैन्याचं नुकसान झालं नसल्याचं सांगितलं होतं पण आता चीनच्या एका सरकारी वृत्तवाहिनीकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार, 4 चीनी सैनिक या हिंसक झटापटीमध्ये गमावल्याचं त्यांनी अधिकृतपणे म्हटलं आहे. त्यांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान काहींना त्यांनी गौरवले देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Pangong lake मधून चीनी सैन्य माघारी, टेंट काढत टॅंक घेत असलेल्या PLA जवानांचा व्हिडिओ प्रसिद्ध (Watch Video).

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांची नावं क्यु फबाओ, चेन होंगून, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन अशी आहेत. यामध्ये 'ग्लोबल टाईम्स'नं 'पीएलए डेली'च्या बातमीचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार क्युई फबाओ हे पीएलएच्या शिनजियांग सेना तुकडीचे रेजिमेन्टल कमांडर होते. या शहीदांमध्ये चार जणांचा मृत्यू हिंसक झडप झाल्याने तर एकाचा मृत्यू रेस्क्यू दरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाल्याची माहिती आहे.(नक्की वाचा: राष्ट्रीय युद्ध स्मारकावर झळकणार लडाख मधील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांची नावे).

ANI Tweet

जून 2020 मध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या या हिंसक झटापटीमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले आहे होते. पूर्व लद्दाख मध्ये पॅन्गाँग सरोवराच्या भागात दोन्ही सैन्यांमध्ये मागील काही दिवस तणावाची स्थिती होती मात्र आता परिस्थिती निवळली आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही बाजूच्या सैन्याने या भागातील टॅंक मागे घेतले आहेत.