कॅनडाच्या (Canada) संसदेचे खासदार विल्यम अमोस (William Amos) हे आपल्या अश्लील कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याआधी ते डिजिटल बैठकीदरम्यान अचानक कपड्यांविना (Nude) कॅमेरासमोर आले होते. त्यानंतर आता महिन्याभरातच पुन्हा एकदा त्यांनी अशी गोष्ट केली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. आता खासदार विल्यम अमोस ऑनलाईन उच्च-स्तरीय बैठकीत चक्क कॉफी कपमध्ये लघवी (Urinate) करताना दिसले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक होत होती, त्या दरम्यान खासदार अमोस लघवी करताना दिसले. त्यांच्या या कृतीमुळे सभेत उपस्थित असलेल्या इतर लोकांसाठी अतिशय लाजीरवाणी परिस्थिती निर्माण झाली.
ही घटना 26 मे रोजी घडली आहे. या प्रकरणात वाद वाढत असताना, कॅनडाचे खासदार विल्यम अमोस यांनी त्यांच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. गुरुवारी रात्री खासदार आमोस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, 'काल रात्री हाऊस ऑफ कॉमन्सच्या बैठकीदरम्यान मी चुकून एक गैर-सार्वजनिक काम केले. मी कॅमेर्यावर आहे हे विसरून मीटिंग दरम्यान लघवी केली. मला माझ्या कृत्याची खूप लाज वाटते.’
Please see my statement. Veuillez lire ma déclaration. pic.twitter.com/ICc8WjqNZi
— William Amos (@WillAAmos) May 28, 2021
ते पुढे म्हणतात, जरी हे अपघाताने घडलेले कृत्य असले तरी ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मी सर्वांची माफी मागत काही कालावधीकरीता आपल्या पदावरून पायउतार होत आहे. याकाळात मला माझ्या कुटुंबाने व स्टाफने दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी आभारी आहे.’ (हेही वाचा: Canada च्या संसदेची मान शरमेने खाली; व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान खासदार William Amos दिसले नग्न, मोबाईलने झाकला आपला Private Part)
दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रूड यांच्या लिबरल पार्टीचे सदस्य असलेले अमोस ऑन कॅमेरा न्यूड दिसले होते. फोटोमध्ये दिसत आहे की, त्यांनी आपला प्रायव्हेट पार्ट मोबाईलने झाकला आहे. त्यानंतरही अमोसने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली होती. अमोस 2015 पासून पोंटिएकच्या क्यूबेक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.