धक्कादायक! पत्नीच्या 'या' गोष्टीपायी रागाच्या भरात व्यावसायिक पतीने जाळले 7 कोटी रुपये; शिक्षा ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पती-पत्नीची भांडणं जगासाठी काही नवीन नाही. भांडणाने प्रेम वाढते हे सर्वश्रुत आहे मात्र पती-पत्नीमधील भांडणं विकोपाला गेली तर त्याचे रुपांतर एक तर मारहाणीत होते नाही तर घटस्फोटात. मात्र घटस्फोटानंतरही पत्नीवरील रागापायी एका व्यावसायिकाने 7.13 कोटी रुपये जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यावसायिकाच्या या विक्षिप्त कृत्यापायी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने 30 दिवसांची शिक्षा दिली आहे. ही घटना खूपच धक्कादायक असून असे कृत्य करुन या व्यावसायिकाने न्यायालयाचा अपमान केल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.

ही घटना आहे कॅनडामधील (Canada) . येथील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागू नये म्हणून 7.13 कोटी रुपये (10 लाख डॉलर) जाळून टाकले. ब्रूस मेककॉनविले असे याचे नाव असून त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. न्यायालयाचा अवमान केल्यानं त्याला 30 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी घातक ठरतील हे आजार, वेळीच व्हा सावधान

पत्नीच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेने मी चिडलेला होतो. त्यामुळे मी पैसे जाळल्याचे पतीने सांगितले आहे. या घटस्फोटीत दाम्पत्याला एक मुलगा आहे. त्यामुळे असे कृत्य करुन त्याने केवळ न्यायालयाचा अपमान केला नाही तर मुलाच्या भविष्याकडेही दुर्लक्ष केल्याचे न्यायलयाने सांगितले आहे.

इतकेच नव्हे तर त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेत त्याला दररोज दीड लाख रुपये न्यायालयास देण्यास सांगितले आहे.

काही महिन्यापूर्वी पत्नीचा अन्य पुरुषांसोबत लीक झालेला अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीला हा धक्का सहन न झाल्याने विषारी पदार्थाचे सेवन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना हरियाणातील यमुनानगर (Yamuna Nagar) येथे घडली.