तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी घातक ठरतील हे आजार, वेळीच व्हा सावधान
Married Couple (Photo Credits: PixaBay)

आपलं लग्नानंतर आयुष्य म्हणजेच आपले वैवाहिक जीवन सुखी (Happy Married Life), आनंदी आणि चांगले जावे असे कोणत्या जोडप्याला वाटणार नाही. मात्र हा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा पति-पत्नी (Husband And Wife) मानसिक आणि शारीरिकरित्या स्वस्थ असतील. आपल्या जोडीदारासोबत शारीरिक आणि मानसिक दृष्टीने एकमेकांशी जोडलेले असणे चांगल्या नात्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आपल्या जोडीदाराला काही गंभीर आजार नाही हे तपासून घेणे खूप गरजेचे आहे. कारण असे असल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

कदाचित त्या दाम्पत्याच्या नात्यात कडवटपणा किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि नात्यात जर अशा गोष्टी यायला लागल्या तर नाते तुटायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून आपले वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचे आहेत तर या 5 आजारांबाबत (Diseases) नेहमी सतर्क राहा

1. ताणतणाव (Depression)

धकाधकीच्या जीवनात आणि कामाच्या व्यापात आपण अनेकदा तणावग्रस्त होतो. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जर तुम्ही मानसिक ताणतणावाखाली असाल तर त्याचे परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होतो. आपल्या जोडीदारावर चिडचिड करणे, भांडण-तंटे असे प्रकार सुरु होतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणे सोडून द्या.

2. मधुमेह (Diabetes)

मधुमेह हा एक असा आजार आहे जो हळू हळू अनेक आजारांना आमंत्रण देतो. आपल्या शरीरात मधुमेहाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर आणि नसांवर होईल. त्याचबरोबर तुमच्या गुप्तांगामधील रक्तप्रवाह ही बाधित होऊ शकतो. महिलांना अशा वेळी गुप्तांगाजवळ सुकेपणा किंवा दुखण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल तर योग्य तो औषधोपचार घ्या तसेच स्वत:च्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या

3. एड्स (HIV)

एड्स हा महाभयंकर असा आजार आहे. ज्याच्यावर कोणताच इलाज करता येणार नाही. हा आजार हळूहळू तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करत पुर्णत: नष्ट करतो. यामुळे हा आजार जर तुमच्या जोडीदाराला असेल तर वेळीच सावध व्हा अथवा आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन सर्व सांगा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या जोडीदारावरही होऊ शकतो.

4. हृदयरोग (Heart Disease)

हृदयरोग हा देखील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे सेक्स लाईफ संबंधी समस्या वाढू शकतात. हृदयरोगापासून वाचण्यासाठी चांगल्या आणि उत्तम लाईफस्टाईल साठी उत्तम आहार आणि निरोगी शरीरावर लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमच्या जोडीदाराला हृदयासंबंधी काही आजार असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती उपचार करावेत.

हेही वाचा- प्रत्येक जोडप्यामध्ये या 5 गोष्टी असतात भांडणाची कारणे, कसा काढाल तोडगा?

5. कर्करोग (Cancer)

हा असा रोग आहे ज्याचे निदान लवकर केले तर वेळीच औषधोपचार घेऊन हा आजार बरा होऊ शकतो. मात्र या आजाराचे लवकर निदान न झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो किंवा दगावण्याचीही शक्यता असते. ज्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.

जर आपले वैवाहिक जीवन छान आणि आनंदी जावे असे वाटत असेल तर या आजारांवर लक्ष देणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे तो सुंदर आणि निरोगी घालवायचा असेल तर या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)