Britain Election: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची अभूतपूर्व मुसंडी, युकेच्या पंतप्रधान पदापासून आता फक्त एक पाऊल लांब
Rishi Sunak (Photo Credit - Twitter)

भारतीय वंशाचे  ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी अभूतपूर्व मुसंडी मारली आहे. आता ब्रिटनच्या (UK) पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर ऋषी सुनकचं विराजमान होणार असं चित्र जवळजवळ स्पष्ट होवू लागलं आहे. ऋषी सुनक यांना चौथ्या फेरीमध्ये 118 मतं मिळाली आहेत तर कामी बडेनोच (Kemi Badenoch) आज बाद झाल्या आहेत. आता या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये केवळ ट्रेड मिनिस्टर (Tread Minister) पेनी मॉरडंट (Penny Mordaunt), फॉरेन सेक्रेटरी (Foreign Secretory) लिझ ट्रस (Liz Truss) आणि अर्थमंत्री ऋषी सुनक असे तीन 3 उमेदवार उरले आहेत. शर्यतीमध्ये केवळ 2 उमेदवार राहत नाहीत तो पर्यंत म्हणजेच गुरूवार पर्यंत या फेर्‍या सुरू ठेवल्या जाणार आहेत.

 

बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पासूनच ऋषि सुनक ब्रिटनचे (UK) नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार अशी आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर चर्चा रंगली आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यास ते  भारतीय वंशाचे पहिले ब्रिटनचे पंतप्रधान (Prime Minister) असतील. ब्रिटीश सरकारमध्ये आधी सुनक ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. कोरोनाच्या (Corona) काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुक झाले आणि नंतर ते ब्रिटेनचे अर्थमंत्री झालेत. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. (हे ही वाचा:-Elon Musk threat to Parag Agrawal: एलॉन मस्क यांची ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना धमकी)

 

ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.  2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह (Conservative) पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांपैकी 48 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सुनक एक चांगला पंतप्रधान बनतील. 'द संडे टेलिग्राफ' (The Sunday Telegraph)च्या वृत्तानुसार, जे एल पार्टनर्सने (J L Partners) केलेल्या जनमत सर्वेक्षणात 4,400 हून अधिक लोकांचा समावेश होता. ओपिनियन पोलमध्ये (Opinion Pole) ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.