Illia 'Golem' Yefimchyk (Photo Credit : x0

Bodybuilder Death: अनेक लोक फिटनेससाठी दररोज व्यायाम करतात. असे म्हटले जाते की यामुळे शरीराचे स्नायू तर पिळदार होतातच मात्र, हृदय आणि मनही निरोगी राहते. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये फिट समजल्या जाणाऱ्या लोकांच्या आकस्मिक मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. असाच एक प्रकार बेलारूसमधून समोर आला आहे. इथे जगातील सर्वात जास्त ताकद्वार किंवा मॉन्स्टर बॉडीबिल्डर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इल्या गोलेमचे (Illia Golem) वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने फिटनेस इंडस्ट्रीमधील लोकांना मोठा धक्का बसला आहे.

बेलारूस येथील रहिवासी असलेल्या इल्या गोलेम याला 6 सप्टेंबर रोजी घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्या पत्नीने सीपीआर केला, पण उपयोग झाला नाही. नंतर त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही. रशियन वृत्तपत्र Kommersant ने सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी बॉडीबिल्डरला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोमात गेला. 11 सप्टेंबर रोजी त्याच्या मृत्यूची पुष्टी झाली. (हेही वाचा: Cricketer Death: क्रिकेटच्या मैदानात खेळाडूला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापुर्वी झाला मृत्यू)

गोलेम त्याच्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता. 61 इंच छाती आणि 25 इंच बायसेप्ससाठी तो लोकप्रिय होता. गोलेम दिवसातून सात वेळा खात असे. तो दररोज 16,500 कॅलरी वापरत असे, ज्यामध्ये सुशीचे 108 तुकडे आणि दोन किलोग्रॅमपेक्षा जास्त स्टेक (मांस) समाविष्ट होते. गोलेम '340 पाउंड बीस्ट' म्हणून ओळखला जात असे. त्याची उंची 6 फूट 1 इंच होती. मेन्स हेल्थ मॅगझिनने त्याच्या रोजच्या आहाराबद्दल खुलासा केला होता.

 Illia 'Golem' Yefimchyk Death-

बेंच प्रेस व्यायामादरम्यान गोलेम अनेकदा 600 पौंड (272 किलो) वजन उचलू शकत होता. यासह तो 700 पौंडांची डेडलिफ्ट करत असे. विशेष म्हणजे तो कोणत्याही स्पर्धेत व्यावसायिकरित्या सहभागी झाला नव्हता, परंतु सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होता. त्याचे वजन सुमारे 158 किलो होते. या 36 वर्षांच्या खेळाडूने लहानपणीच जिम जॉईनकेली होती. त्याला अरनॉल्ड श्वार्झनेगर आणि सिल्वेस्टर स्टॅलोनसारखे व्हायचे होते.