Indian Student Found Dead In London Lake: बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडनच्या तलावात सापडला; UK पोलिसांकडून तपास सुरू
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Indian Student Found Dead In London Lake: गेल्या गुरुवारी ब्रिटनमध्ये बेपत्ता झालेला 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह (Body of Missing Indian Student) पूर्व लंडनच्या कॅनरी वार्फ भागातील तलावात (London Lake) सापडला. गुरशमन सिंग भाटिया (Gurashman Singh Bhatia) असं या विद्यार्थ्याच नाव आहे. गुरशमन 14 डिसेंबर रोजी मित्रांसोबत नाईट आऊट केल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्यानंतर ब्रिटनचे मेट्रोपॉलिटन पोलिसांनी गुरुवारी बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याच्या शेवटच्या हालचालींची माहिती घेतली.

पोलिसांनी सांगितले की, 23 वर्षीय तरुण गेल्या गुरुवारी 14 डिसेंबरला मित्रांसोबत नाईट आऊट केल्यानंतर बेपत्ता झाला होता. पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुरशमनचा मृतदेह शोधून काढला. परिसरातील सर्व नद्या आणि तलावांचाही शोध घेण्यात आला. दरम्यान, पोलिस गोताखोरांनी साउथ क्वे येथे पाण्यातून एक मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून तो गुरशमनचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. (हेही वाचा -Mayushi Bhagat Info Reward: बेपत्ता भारतीय विद्यार्थिनी मायुशी भगत हिचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास FBI द्वारा 10,000 डॉलर्सचे बक्षीस )

विद्यार्थ्याचा मृत्यू अपघाती -

कॅनरी वार्फच्या टॉवर हॅम्लेट्स भागातील स्थानिक पोलिसिंग अधिकारी डिटेक्टिव्ह चीफ सुपरिटेंडेंट (डीसीआय) जेम्स कॉनवे यांनी सांगितले की, 'गुरशमनचा मृत्यू अपघाती मानला जात आहे. तथापि, आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत. आम्ही गुर्शमनची एक सीसीटीव्ही प्रतिमा प्रसिद्ध केली. जी तो बेपत्ता होण्यापूर्वी घेण्यात आली होती. ज्यांनी त्याला पाहिले त्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती द्यावी, असं आवाहन आम्ही नागरिकांना केलं होतं, असंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Indian Student Found Dead In London River: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीतआढळला)

पोलिसांनी सांगितले की, गुर्शमनची अद्याप औपचारिक ओळख पटली नसली तरी गुर्शमनच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. बेपत्ता शीख विद्यार्थ्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थी समुदायाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आवाहन केले होते.