Missing | (Photo credit: archived, edited, representative image)

न्यू जर्सी येथून चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतातील 29 वर्षीय विद्यार्थिनीची माहिती देणाऱ्याला FBI ने तब्बल 10,000 डॉलरचे (USD) बक्षीस (Mayushi Bhagat Info Reward) जाहीर केले आहे. मायूशी भगत (Missing Indian Student Mayushi Bhagat) असे या विद्यार्थीनिचे नाव आहे. "रंगीत पायजमा पॅंट आणि काळा टी-शर्ट" अशा वेशात न्यू जर्शी शहरात 29 एप्रिल 2019 रोजी संध्याकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडलेली मायूशी परतलीच नाही. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, 29 एप्रिलपासून बेपत्ता असलेली मायूशी हरवल्याची तक्रार 1 मे 2019 रोजी नोंदवली गेली.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, अद्यापपर्यंत तरी हाती काहीही लागले नाही. परिणामी BI नेवार्क फील्ड ऑफिस आणि जर्सी सिटी पोलिस विभागास सार्वजनिक मदत घेण्यास सांगितले. त्यानुसार भगत हिची माहिती देणारास $10,000 बक्षीस देऊ केले गेले आहे. गेल्या जुलैमध्ये, एफबीआयने अधिकृतपणे मयुशी भगतला त्याच्या "मिसिंग पर्सन" यादीत समाविष्ट केले आणि लोकांना संबंधित माहिती सामायिक करण्याचे आवाहन केले. जुलै 1994 मध्ये भारतात जन्मलेली भगत 'विद्यार्थी व्हिसा'वर न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती. (हेही वाचा, Indian Student Found Dead In London River: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीतआढळला)

एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तिचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये भाषेत प्राविण्य होते. काळे केस, तपकिरी डोळे, 5 फूट10 इंच उंची, आणि मध्यम व सडपातळ बांधा असलेली भगत 2016 मध्ये F1 विद्यार्थी व्हिसावर युनायटेड स्टेट्समध्ये आली होती. तिचे 'मिसिंग पर्सन' पोस्टर FBI च्या "मोस्ट वॉन्टेड" पृष्ठावर "अपहरण/मिसिंग पर्सन" अंतर्गत ठळकपणे वैशिष्ट्यीकृत करण्यात आले आहे. न्यू जर्सीच्या साउथ प्लेनफिल्डमध्ये तिचे मित्र आहेत.

FBI ने मयुशी भगत, हिचा ठावठिकाणा किंवा तिच्या बेपत्ता झाल्याच्या परिस्थितीबद्दल माहिती असलेल्या कोणालाही FBI नेवार्क किंवा जर्सी शहर पोलिस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिच्याबद्दल माहिती प्रदान करणाऱ्या व्यक्ती $10,000 पर्यंतच्या बक्षीसासाठी पात्र असतील.