Blood Stains On Flight Seat (PC - Twitter)

Woman Finds Blood Stains On Flight Seat: कॅनडातील प्रख्यात एअर ट्रान्सॅटमध्ये (Canadian Airline) एका प्रवाशाने विचित्र घटना शेअर केली. ज्यामुळे अनेक प्रवासी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचा अविश्वास निर्माण झाला आहे. व्यवसायाने एक परिचारिका असलेल्या बिर्गिट उमाइग्बा ओमोरुयी (Birgit Umaigba Omoruyi) यांनी सोशल मीडियावर एअरलाइनसोबतच्या फ्लाइट दरम्यानचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. फ्लाइटमध्ये महिलेला तिच्या समोरच्या सीटवर रक्ताचे डाग आढळले.

बिर्गिटच्या म्हणण्यानुसार, केबिन क्रूला अस्वच्छ स्थितीबद्दल सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने तिला रक्ताचे डाग पुसण्यासाठी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दिला आणि सीट स्वतः साफ करण्याची सूचना दिली. विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी महिलेला हातमोजे घालण्याची विनंती करावी लागली. (हेही वाचा - Paraguay Plane Crash Video: सत्ताधारी पक्षाचे नेते Walter Harms सह 3 जणांचा विमान अपघतामध्ये मृत्यू)

बिर्गिट यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'प्रिय @airtransat. आणखी काय सांगू? माझ्या समोरच्या सीटवर ताजे रक्त शोधणे पुरेसे नाही, तुमच्या एका फ्लाइट अटेंडंटने ते मला हातांनी पुसण्यासाठी मला जंतुनाशक दिलं. सामान्य ज्ञानाबद्दल देवाचे आभार, मी हातमोजे मागितले आणि सांगितल्याप्रमाणे रक्त पुसले. (हेही वाचा - France Plane Crash: कॅरिबियन येथील टेरे दे हौते बेटावर विमान कोसळलं, अपघातात पाच जणांचा मृत्यू)

तथापी, महिला प्रवाशाने पुढे म्हटलं आहे की, 'पुढच्या वेळी, संपूर्ण विमान साफ करण्यात मदत करण्यासाठी मला मोकळ्या मनाने कॉल करा, जेणेकरून असे पुन्हा कधीही होणार नाही'