25 Million Dollar Compensation:  44 वर्षांच्या तुरुंगवासाबद्दल 25 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई
Dollar sign | Representational Image (Photo Credits: Pixabay)

North Carolina News: रॉनी वॉलेस लॉन्ग (Ronnie Wallace Long) नावाच्या व्यक्तीला तब्बल 25 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम नुकसानभरपाईपोटी (Compensation) मिळाली आहे. ही रक्कम त्याला एखाद्या खटल्यात नव्हे तर खटल्यामध्ये झालेल्या शिक्षेच्या बदल्यात मिळाली आहे. होय, नॉर्थ कॅरोलीनामधील (North Carolina Crime) या कृष्णवर्णी (Black Man) व्यक्तीला एका खटल्यात चुकीच्या पद्धतीने चक्क 44 वर्षांची झाली होती. अखेर सत्य स्थिती पुढे आल्यानंतर झालेली चुक सुधारत त्याची मुक्तता करण्यात आली आणि झालेल्या नुकसानापोटी आर्थिक मोबादला म्हणून दशलक्ष डॉलरची मदत नुकसान भरपाईपोटी देण्यात आली.

दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

रॉनी वॉलेस लॉन्ग याला एका गोर्‍या महिलेवर बलात्कार आणि घरफोडी केल्याबद्दल दोषी ठरलेल्या 1976 मध्ये एका श्वेतवर्णी न्यायाधीशाने दोषी ठरवले होते. विशेष म्हणजे त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो शिक्षा भोगत होता मात्र लॉन्गच्या आयुष्यात एक धक्कादायक क्षण आला. त्याला फेडरल कोर्टाने आपील करण्याची संधी दिली. ज्यामध्ये आगोदरच्या कोर्टाने ठोठावलेली शिक्षा चुकीची होती हे निष्पन्न झाले. त्यामुळे सध्या वयाच्या 68 वर्षात पदार्पण केलेल्या लॉन्गची तत्काळ सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच लॉंगने 2021 मध्ये नॉर्थ कॅरोलिना राज्य आणि कॉनकॉर्ड शहराविरुद्ध खटला दाखल केला. (हेही वाचा: Metaverse Gang-Rape Case: अल्पवयीन मुलीवर 'व्हर्च्युअल बलात्कार', युकेमधील बहुदा पहिलीच घटना)

कॉन्कॉर्ड शहराकडून लेखी माफी

लॉन्गने दाखल केलेला खटला कोर्टात टिकला आणि त्याने तो जिंकला सुद्धा. या खटल्यामध्ये स्थानिक सरकारकडून नुकसनाभरपाई देण्यात आली. ज्यामध्ये 25-दशलक्ष आणि कॉन्कॉर्ड शहराकडून लेखी माफीचा समावेश आहे. या माफीमध्ये लॉन्गला झालेली दीर्घ शिक्षा आणि त्याचे आयुष्य तुरुंगात खितपत पडलेल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.

द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार,शहर प्रशसानाने व्यक्त केलेल्या खेदपत्रात म्हटले आहे की, "आम्ही श्री लाँग, त्यांचे कुटुंब, मित्र आणि आमच्या समुदायाला प्रचंड हानी पोहोचवणार्‍या भूतकाळातील चुकांसाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. लाँग आणि त्याच्या कुटुंबाकडून जे गमावले गेले. ते पूर्णपणे पुनर्संचयित करणे अशक्य असले तरी, परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मागील घटनांची जबाबदारी स्वीकारत आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारण्याची वचनबद्धता दर्शवतो. (हेही वाचा, Jeffrey Epstein List: लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक; Michael Jackson, Stephen Hawking, Bill Clinton सारख्या प्रसिद्ध नावांचा समावेश)

ड्यूक युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमधील काही लोकांनी लॉन्ग याची कायदेशीर लढाई लढली. ज्यामध्ये पुढे आले की, फॉरेन्सिक क्लिनिकने तपासलेल्या नमुन्यांमध्ये लॉंगच्या आणि अज्ञात वीर्य नमुन्यांशी जुळणारे 40 हून अधिक बोटांचे दर्शवले गेले. मात्र, त्याचे तपशील कधीही पुढे आले नाहीत. हे प्रकरण पुढे आल्यानंतर राज्य आयोगाने सुरुवातीला 750,000 डॉलर्सचे बक्षीस दिले. नंतर लाँगने रॅले येथील फेडरल कोर्टात न्यायाचा पाठपुरावा केला, कॉन्कॉर्ड पोलिस अधिकार्‍यांवर "असामान्य गैरवर्तन" केल्याचा आरोप केला ज्यामुळे त्याला चुकीची शिक्षा आणि तुरुंगवास झाला. या शिक्षेमुळे त्याच्या नागरी हक्कांचे उल्लंघन झाले, असा त्याचा दावा होता. स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने लाँगचे निर्दोषत्व सिद्ध करणारे पुरावे लपवण्यात आपली भूमिका चुकीची होती हे मान्य केले.