Jeffrey Epstein, Former American Financier (Photo Credit: Wikipedia)

Jeffrey Epstein List: अमेरिकेच्या राजकारणात आणि ब्रिटनच्या राजघराण्यात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेतील अनेक बड्या व्यक्ती आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील अनेक लोक सेक्स रॅकेटमध्ये अडकले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टाने गुरुवारी अब्जाधीश आणि वेश्याव्यवसायातील दोषी जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) याच्याशी संबंधित खटल्यातील कायदेशीर कारवाईची काही कागदपत्रे सार्वजनिक केली. या कागदपत्रांमध्ये अमेरिकेतील अनेक बड्या व्यक्तींची नावे आली आहेत.

जेफ्रीवर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्याच्यावर 2002 ते 2005 दरम्यान फ्लोरिडा येथील आपल्या घरी महिलांना शारीरिक संबंधांसाठी बोलावून त्या बदल्यात पैसे दिल्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर जबरदस्ती संबंधांचेही आरोप आहेत. 2019 मध्ये, जेफ्री एपस्टाईनने तुरुंगात गेल्यानंतर एका महिन्याने आत्महत्या केली. हा खटला आता त्याचा साथीदार घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध सुरू आहे, मॅक्सवेलवर जेफ्रीसाठी मुली पुरवल्याचा आरोप आहे. या दस्तऐवजात डझनभर मुलींच्या विधानांचा समावेश आहे ज्यांचे जेफ्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लैंगिक शोषण केले होते.

कोर्टाने या खटल्यासंबंधी 170 लोकांची नावे जाहीर केली आहेत, जे जेफ्री एपस्टाईन याच्याशी कथितरित्या संबंधित होते. या लोकांमध्ये पीडित मुली, साक्षीदार, एपस्टाईनचे कर्मचारी आणि अनेक आरोपींचा समावेश आहे. कागदपत्रात काही नावे सार्वजनिक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण यामध्ये शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, पॉपस्टार मायकल जॅक्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नावांचा समावेश आहे.

अमेरिकन मीडिया हाऊस फॉक्स न्यूजनुसार, कोर्टात दिलेल्या निवेदनात पीडित व्हर्जिनिया गिफ्रेने 2015 मध्ये आरोप केला होता की जेफ्री एपस्टाईनने तिला स्टीफन हॉकिंगसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. मीडिया हाऊस सीएनएननुसार, कोर्टाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन यांचे नाव 50 पेक्षा जास्त वेळा लिहिले गेले आहे. 2016 मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान पीडित जोहाना स्जोबर्गने सांगितले होते की बिल क्लिंटन यांनी एपस्टाईनच्या खाजगी विमानातून अनेकदा प्रवास केला होता. याआधी एका चौकशीदरम्यान जेफ्रीने सांगितले होते की, तो तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडे मुली पाठवायचा, कारण त्यांना तरुण मुली आवडतात. तसेच या मुलींना मालिश करताना कोणतेही कपडे घालण्याची परवानगी नव्हती. (हेही वाचा: Metaverse Gang-Rape Case: अल्पवयीन मुलीवर 'व्हर्च्युअल बलात्कार', युकेमधील बहुदा पहिलीच घटना)

न्यूजनुसार, व्हर्जिनिया गिफ्रेने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये काम केले होते. 2019 मध्ये, जिफ्रेने कोर्टात सांगितले होते की, ती 2000 मध्ये जेव्हा ट्रम्प यांच्या क्लबच्या लॉकर रूममध्ये काम करायची, तेव्हा तिथे एपस्टाईन तिच्याशी जबरदस्तीने सेक्स करायचा.

दुसरीकडे, पीडित जोहाना स्जोबर्गने कोर्टाला सांगितले होते की, 2001 मध्ये ती किंग चार्ल्सचा भाऊ प्रिन्स अँड्र्यूला भेटली होती. ती म्हणाली होती की, ती जेव्हा मॅनहॅटनमधील एपस्टाईनच्या घरी गेली होती, तेव्हा प्रिन्स अँड्र्यू तेथे उपस्थित होता. त्याने तिला त्याच्या मांडीवर बसायला सांगितले. यानंतर त्याने तिला अश्लील रीतीने स्पर्श केला. त्याचप्रमाणे प्रिन्स अँड्र्यूचे व्हर्जिनिया गिफ्रेसोबतही संबंध होते. जिफ्रेने कोर्टात सांगितले होते की, ती जेव्हा 17 वर्षांची होती तेव्हा जेफ्री एपस्टाईन तिला अँड्र्यूकडे घेऊन गेला होता. या आरोपावर कारवाई करत राजा चार्ल्सने प्रिन्स अँड्र्यूला राजघराण्यातून बेदखल केले.

'किंग ऑफ पॉप' मायकल जॅक्सन आणि जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांच्या नावांचाही उल्लेख या यादीमध्ये आहे. तसेच नाओमी कॅम्पबेल, लिओनार्डो डिकॅप्रियो, ब्रॅडली एडवर्ड्स, लुईस फ्रीह, स्टीफन हॉकिंग, जॉर्ज लुकास, जेसन रिचर्ड्स, केविन स्पेसी, ब्रूस विलिस आणि डॅनियल विल्सन यांच्या नावांचाही या कागदपत्रांमध्ये समावेश आहे.