Bird Flu in US: टेक्सास येथे मांजरीला गाईचे कच्च्या दूध (raw milk from infected cows)पिऊन बर्ड फ्लू झाल्याने अंधत्व आणि मृत्यू (Cat Died) झाला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने टेक्सास डेअरी फार्मवरील मांजरींमध्ये H5N1 बर्ड फ्लू(Bird Flu)चा लक्षणीय प्रादुर्भाव नोंदवला आहे. कमीतकमी 24 मांजरींमध्ये उदासीन मानसिकेची स्थिती, अंधत्व आणि जास्त श्लेष्मल स्त्राव यासह गंभीर लक्षणे दिसून आली. त्यातील अर्ध्याहून अधिक मांजरांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा :Bird Flu Outbreak: 'कच्चे दूध पिऊ नका, पुरेशा तापमानात मांसाहार शिजवा', बर्ड फ्लूबाबत केंद्राचा सल्ला )
डेली मेलच्या वृत्तानुसार, तपासणीत असे दिसून आले की संक्रमित गायींचे दूध पिल्ल्यानंतर मांजरींना विषाणूचा संसर्ग झाला. पिलेल्या दुधातील विषाणू फुफ्फुस, मेंदू, हृदय आणि डोळ्यांसह शरिरातील अनेक अवयवांमध्ये आक्रमकपणे पसरला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सीडीसीच्या निष्कर्षांमुळे विविध सस्तन प्राण्यांमध्ये H5N1 विषाणूच्या अनुकूलता आणि प्रसाराविषयी चिंता वाढली आहे. या प्राण्यांच्या संपर्कातून मानवी संसर्ग संभव नसतानाही, सीडीसीने चिंता व्यक्त केली आहे.
H5N1 विषाणूच्या 2.3.4.4b स्ट्रेनची उपस्थिती
दोन मृत मांजरींची आणि संक्रमित गायींच्या दुधाच्या नमुन्यांची तपासणीत केली असता. त्यात H5N1 विषाणूच्या 2.3.4.4b स्ट्रेनच्या उपस्थितीची पुष्टी झाली. फ्लोरिडामध्ये नुकत्याच झालेल्या डॉल्फिनच्या मृत्यूतूनही हेच कारण समोर आले आहे. मांजरींव्यतिरिक्त गायींमध्ये ही अशीच लक्षणे पाहिली गेली आहेत. ज्यात त्यांच्या स्तन ग्रंथींमध्ये लहान जखमांची उपस्थिती आढळली. H5N1 चा प्रसार संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील कोंबड्या आणि इतर प्राण्यांमध्ये आढळून आला आहे. ज्याचा परिणाम आठ राज्यांमधील 29 शेतातील प्राण्यांवर झाला आहे.