Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

भारतामध्ये कोरोना व्हायरस फैलावाची परिस्थिती लक्षात घेता आता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक (International Commercial Passenger Flights) 30 सप्टेंबर खंडीत ठेवत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान काही तासांपूर्वीच केंद्र सरकारने अनलॉक 4 ची नियमावली जारी केली आहे. त्यानुसार अद्याप नियमित विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान DCGA कडून देण्यात आलेली कार्गो विमानांसाठी सेवा सुरू राहील तसेच इतर मार्गांवर परवानगी देण्यात आलेल्या विमानसेवा कायम राहणार आहे असे देखील केंद्र सरकारने दिली आहे.

परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत मोहिम सुरू करण्यात आली आहे. तसेच एअर बबलच्या माध्यमातून अमेरिका, युके, युएअई मध्ये खबरदारी घेत प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच काही परदेशी पत्रकारांना आता भारतामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र उर्वरित ठिकाणी अजूनही विमानसेवा सुरळीत सुरू करण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

ANI Tweet

दरम्यान कोरोना संकटकाळातही प्रवाशांना कार्गोच्या माध्यमातून वस्तू, औषधं आणि अन्य सामान पाठवण्याची सोय खुली होती ती कायम ठेवण्यात आली आहे. तर अन्य काही मार्गांवर केंद्र सरकार एअर इंडिया आणि अन्य खाजगी विमान वाहतूक कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. ती वाहतूक कायम ठेवली जाणार आहे.

भारतामध्ये सध्या 36 लाखांच्या पार एकूण रूग्ण संख्या गेली आहे. अशामध्ये कोरोनावर ठोस औषध, उपचार हाती नसताना पुन्हा ये-जा सुरू करणं धोक्याचं ठरू शकतं या अनुषंगाने आता निर्बंध 30 सप्टेंबर पर्यंत वाढवले आहेत. काही दिवसांपूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून भारत श्रीलंका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, इटली, न्यूझिलंड सह 13 देशांसोबत एअर बबलच्या माध्यमातून विमानसेवा सुरू करण्यासाठी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.