Weight Loss Drug: वजन कमी करण्याचे औषध घेतल्याने ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू; मुलीच्या लग्नापूर्वी घाई नडली
Weight Loss | Representational image (Photo Credits: pxhere)

Australian Woman Dies: आपण सुडौल दिसावे असे कोणाला नाही वाटत? सहाजीकच सर्वांना वाटते. त्यासाठी काही लोक नैसर्गिकरित्या व्यायाम आणि आहाराचे व्यवस्थापण करतात काही लोक औषधांचा आधार घेतात. काही लोक शस्त्रक्रिया करतात. काही लोक हट्टाला पेटून अतिरेकही करतात. जो त्यांच्या जीवावर बेततो. ऑस्ट्रेलियातील महिलेसोबतही असेच काहीसे घडल्याचे पाहायला मिळाले. या महिलेला आपल्या मुलीच्या लग्नापूर्वी सुडौल व्हायचे होते. वजन अधिक वेगाने घटवायचे होते. अशा वेळी, तिने एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. ज्यांनी त्यांना ओझेम्पिक लिहून दिले. दरम्यान, डॉक्टरांनी लिहून दिलेले वजन कमी करण्याचे औषध (Weight Loss Drug) घेतल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया होऊन तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ट्रिश वेबस्टर असे या महिलेचे नाव आहे. ती 56 वर्षांची होती. तिला काहीही करुन मुलीच्या लग्नापूर्वी वजन कमी करायचे होते. डॉक्टरांनी तिला लिहून दिलेले औषध हे खास करुन टाईप-2 मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, या औषधाचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने तिचा मृत्यू झाल्यानंतर कहाणीला भलतेच वळण मिळाले. महिलेच्या पतीने याविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे लोकप्रिय औषध हे वास्तवात मात्र लोकांच्या उपयोगी नसून ते जीवावर बेतणारे असल्याचे म्हटले आहे.

ओझेम्पिक हे वजन कमी करणारे औषध जगभरात लोकप्रिय झाले आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या मते, औषध नैसर्गिक संप्रेरक, GLP-1 चे अनुकरण करून कार्य करते. जे पोट आणि आतड्यांमधून अन्न जाण्याचा वेग कमी करते. ज्यामुळे लोकांना पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहते. दरम्यान, जर औषधाने पोट खूप कमी केले किंवा आतडे अवरोधित केले तर यामुळे समस्या देखील उद्भवू शकतात. मिसेस वेबस्टरने सक्सेंडा प्रिस्क्रिप्शन इंजेक्शन सोबत ओझेम्पिक घेतले आणि पाच महिन्यांत त्यांनी सुमारे 15 किलो वजन कमी केले. औषधोपचाराने सुरुवातीला श्रीमती वेबस्टरला पटकन वजन कमी करण्यास मदत केली, परंतु लवकरच ती आजारी पडली.

दरम्यान, मुलीच्या विवाहापूर्वी आजारी पडलेल्या वेबस्टर हिच्या पतीला लक्षात आले की, पत्नीच्या तोंडातून एक तपकीरी दव्र पदार्थ बाहेर पडतो आहे. मी तिच्या जवळ गेलो तेव्हा लक्षात आले की, तिला श्वास घेता येत नव्हता. आम्ही तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. माक्ष तिचा (वेबस्टरचा) त्या रात्री मृत्यू झाला आणि तिच्या मृत्यूचे कारण तीव्र गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार म्हणून सांगितले केले गेले. या औषधामुळे जर असे काही घडते हे माहिती असते तर आम्ही ते मुळीच घेतले नसते असेही तिच्या पतीने म्हटले. "मला कधीच वाटलं नव्हतं की यामुळे तिचा मृत्यू होईल", असेही तिचा पती म्हणाला.