Asteroid Alert by NASA: अनेकदा लघुग्रह (Asteroid )अवकाशातून पृथ्वीवर आदळण्याच्या भीतीने शास्त्रज्ञांची झोप उडते. आता असाच एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याचं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हा लघुग्रह 25 जुलैपर्यंत पृथ्वी जवळ येऊ शकतो. अनेकांना हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरला तर पृथ्वीवर आदळण्याची भिती व्यक्त केली आहे.असं झाल्यास तो एखादं संपूर्ण शहर नष्ट करू शकतो. 380-फूट असलेल्या या लघुग्रहाचे नाव 2011 MW1 असे आहे. लघुग्रह ताशी 28,946 किमी वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. त्यामुळे नासा शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा:NASA Alerts: 180 फूट उंचीची उल्का पृथ्वीजवळून धोकादायक वेगाने जाणार! पृथ्वीशी टक्कर झाल्यास त्याचे काय होणार परिणाम, जाणून घ्या )
नासाच्या सीएनईओएसच्या डेटानुसार, तो पुथ्वीपासून 2.4 दशलक्ष मैल अंतरावर आहे. या खगोलीय हलचालींमुळे नासाने चिंता व्यक्त केली आहे. 25 जुलै रोजी तेो पृथ्वीच्या जवळून जाण्याचा अंदाज आहे. तो पुथ्वीपासून 4.43 दशलक्ष मैल अंतरावरून जाईल. जे अत्यंत जवळचे अंतर आहे. जर लघुग्रह त्याच्या कक्षेतून विचलित झाला तर त्याचे परिणाम भयावह असतील. तो पृथ्वीसाठी संभाव्य आपत्तीजनक असू शकतात. तो पृथ्वीवर आदळू शकतो. (हेही वाचा: NASA Transmits Hip-Hop Song To Venus: नासाने रचला इतिहास! अवकाशात गुंजले हिप-हॉपचे बोल; प्रकाशाच्या वेगाने शुक्रावर प्रसारित केले Missy Elliott चे गाणे)
ॲस्टरॉयड म्हणजे काय?
ॲस्टरॉयड (Asteroid) म्हणजेच लघुग्रह. लघुग्रह किंवा उल्का या बद्दल तुम्ही ऐकलं असेल. लघुग्रह किंवा उल्का हे असे खगोलीय पिंड आहे जे अवकाशात आपल्या सौरमालेत फिरत राहते. सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती फिरतात. तो पृथ्वीसाठी धोकादायक ही आहे. आदळल्यास त्याचा वेग आणि वस्तुमान यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. अशा प्रभावांमुळे मोठ्या प्रमाणावर स्फोट, सुनामी आणि हवामान बदल यासह नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात.