अमेरिकेतील मिसोरी मध्ये एका महिलेने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी असे काम केले ते ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरंतर 48 वर्षीय लॉरा ओगलेस्बे हिने आपल्या मुलीचा आयडी कार्ड चोरुन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या व्यतिरिक्त आयडी कार्डच्या मदतीने लाखो रुपयांचे कर्ज सुद्धा घेतले. त्याचसोबत कॉलेजमध्ये काही तरुण मुलांना डेट सुद्धा केले.(न्युझीलंडमध्ये आता तरुणांना आयुष्यभर सिगरेट खरेदी करता येणार नाही, सरकार लावणार निर्बंध)
न्यूयॉर्क पोस्टमध्ये छापलेल्या बातमीनुसार आरोपी लॉरा ओगलेस्बेने ठरवुन हे प्रकार केले. यासाठी तिने नातेवाईकांना सुद्धा फसवले. 2016 मध्ये ऑरा हिने हे सर्व करणे सुरु केले होते. दोन वर्षापर्यंत हा प्रकार सुरु होता. परंतु अखेर महिलेचा खोटारडेपणा उघडकीस आला होता. तिच्यावर 19 लाख रुपयांचा दंड लावत तुरुंगाची शिक्षा सुनावली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरा नावाच्या महिलेने मुलीचा आयडी कार्ड चोरुन साउथ बेस्ट बेपिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर महिलेने मुलीच्या सोशल सिक्युरिटी कार्डचा वापर ही केला. त्याचसोबत महिलेने ड्रायव्हिंग लाइसन्स सुद्धा आपल्या मुलीच्या नावावर घेतले.(Harassment In Parliament: ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील 63 महिला खासदारांचे लैंगिक शोषण, अशा प्रकारे केली जाते वर्तवणूक)
लॉरा हिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 20 वर्षीय तरुणांना डेट सुद्धा करणे सुरु केले. महिलेने त्याला आपले वय 22 वर्ष आहे. त्यानंतर लॉराने स्नॅपचॅट वर सु्द्धा मुलीच्या नावाचे बनावट अकाउंट केले आहे. तर आपल्या मुलीप्रमाणेच ड्रेसअप ही केले आणि तरुणांना डेट करु लागली. यासाठी लॉरा खुप मेकअप सुद्धा करायची.
अटक करण्यापूर्वी लॉरा ही माउंटेन व्यू मध्ये एका कपल सोबत राहत होती. त्या दोघांना सुद्धा तिने फसवले होते. महिलेने कपलला तिने असे सांगितले होते की, ती एका वाईट रिलेशनशिप मधून बाहेर पडली आहे.महिलेने आपल्या मुलीचा आयडीचा वापर करत 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु तिचा हा बनावटपणा उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला तिने त्यासाठी नकार दिला. पण दमदाटी केल्यानंतर तिने आपला गुन्हा मान्य केला.