Harassment In Parliament: ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील 63 महिला खासदारांचे लैंगिक शोषण, अशा प्रकारे केली जाते वर्तवणूक
Harassment | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Harassment In Parliament:  ऑस्ट्रेलिया मधील संसदेत महिलांच्या लैंगिक शोषण करण्याची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. कारण ऑस्ट्रेलियातील मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्ट्सनुसार, जवळजवळ 63 महिला खासदारांसोबत लैंगिक शोषण झाले आहे. रिपोर्टमध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, हा सर्व प्रकार संसदेच्या आतमध्येच घडला आहे. तर विविध 33 संघटनेच्या 1723 लोकांनी म्हटले की, जवळजवळ 33 टक्के कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक वेळ लैंगिक शोषणाच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. ऐवढेच नव्हे तर रिपोर्टमध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे ही करण्यात आले आहेत.

सरकारच्या माजी एका सल्लागाराकडून संसदेच्या आतमध्ये बलात्कार होत असल्याचा आरोप केल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या प्रकरणी तपास हा मानवाधिकार आयोगाला करण्यास सांगितला. तपासात असे खुलासे झाले की, ते पाहून आणि ऐकून सर्वांना धक्का बसला. या रिपोर्टला पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांनी भयानक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीचे माजी पंतप्रधान यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की, महिला खासदारांसोबत होणाऱ्या घटनांबद्दल ते काहीच बोलण्यास तयार नव्हते.(Kim Jong Un यांच्यासारखी नागरिकांनी नक्कल करु म्हणून नॉर्थ कोरियात Leather Coat वर बंदी)

तपासादरम्यान झालेल्या चौकशीत एका पुरुष खासदाराने महिलेला किस करणे, तिला उचलून घेणे, तिला स्पर्श करणे, तिच्यावर कमेंट्स करणे हे योग्य असल्याचे म्हटले. त्यांनी यामध्ये काय चुकीचे आहे असे ही म्हटले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, महिलांसोबत छळाच्या घटनांमुळे त्यांच्यासह टीमवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो. त्याचसोबत अशा घटनांमुळे संसदेचे काम ही प्रभावित होते.