पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच पाकिस्तान आणि अमेरिका (America) यांच्यासुद्धा तणाव निर्माण झाला. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याचा विचार करत आहेत.
अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत ज्या 10 देशांवर प्रतिबंध घालण्यात येणार आहे त्यामध्ये पाकिस्तानचे सुद्धा नाव आहे. या कायद्याअंतर्गत राष्ट्रातील नागरिकांनी व्हिसावर देण्यात आलेल्या मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव केल्यास आणि व्हिसा परत देण्यास नकार दिल्यास त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे.(जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग, चीनची कबुली)
डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वर्षी पाकिस्तान आणि घाना यांच्या या यादीमध्ये समावेश केला आहे. यापूर्वी 2001 मध्ये गयाना, कंबोडिया, इरिट्रीया, गिनी आणि 2017 मध्ये बर्मा आणि लाओसा या देशाचा समावेश यादीमध्ये होता. तर अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसासाठी पाच वर्षांवरुन कमी करत तीन वर्षे केली असल्याची माहिती पाकिस्तान वृत्तपत्र ट्रिब्यून एक्सप्रेसमध्ये देण्यात आली होती.