Anti Apartheid Movement: वर्णभेद विरोधी लढ्याला Amazon कंपनीकडून 1 कोटी डॉलरची मदत
Amazon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आफ्रीकी वंशाचा नागरिक जॉर्ज फ्लायड (George Floyd) यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जोरदार निदर्शने होत आहेत. या प्रकरणानंतर वर्णभेद (Apartheid) हा मुद्दा पुन्हा एकदा केवळ ऐरणीवरच आला नाही. तर, वर्णभेदाविरुद्ध लढाईही सुरु झाली आहे. दरम्यान, या लढ्याला आता ऑनलाईन सेवा देणाऱ्या Amazon कंपनीनेही पाठिंबा दिला आहे. अॅमेझॉन (Amazon) कंपनीने बुधवारी (3 जून 2020) सांगितले की, वर्णद्वेश विरुद्धच्या लढाईत कंपनीकडून 1 कोटी डॉलर इतकी मदत दिली जाईल. ही मदत कृष्णवर्णीय आणि अफ्रिकी वंशीय अमेरिकी लोकांच्या जीवनात परवर्तन आणण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी वापरण्यात येईल.

दरम्यान, निधी देण्यासाठी केली जाणारी संघटनांची निवड ही Amazon कंपनीच्या ब्लॅक एम्प्लॉई नेटवर्क (BEN) च्या मदतीने करण्यात आली आहे. बीईएनमधेय वर्णभेदाविरुद्ध कायदेशीर लढा देणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. या संस्था कृष्णवर्णीयांना शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. Amazon कंपनीकडून अर्बन लीग आणि यूएनसीएफ आणि इतर संस्थांना देण्यात येणारा निधी संपू्र्ण अमेरिकेत कृष्णवर्णीय समूहाच्या शिक्षण आणि न्याय्य हक्कांसाठी वापरण्यात येईल. (हेही वाचा, George Floyd Death: जॉर्ज फ्लॉयड मृत्यू निषेधार्थ आंदोलना दरम्यान वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना)

बीईएन अध्यक्षा एंजेलिना हॉवर्ड यांनी सांगितले की, Amazon नेतृत्व आणि बीईएन यांनी कृष्णवर्णीय समूहासाठी काम करणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी संयुक्तरित्या काम केले आहे. ज्या बिगरशासकीय आहेत. त्यामुळे त्यांना अर्थपूर्ण मदत केली जाईल. आम्ही स्थानिक पातळीवर समूहांची ओळक पटवून काम करण्यासाठीही काम करु. पुढे बोलताना हॉवर्ड यांनी सांगितले की, सध्याच्या दूर्दैवी घटनांपासून आपले कर्मचारी आणि वर्णभेद लढ्यात भरडल्या जाणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याचा Amazon प्रयत्न करेन.