जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) नामक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान अमेरिकेतील महात्मा गांधींच्या पुतळयाची (Mahatma Gandhi’s statue) विटंबना करण्यात आली. गांधीजींचा हा पुतळा वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) भारतीय दुतावासाबाहेर (Indian Embassy) आहे. युनायटेड स्टेटस पार्क (United States Park) पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिली आहे. (George Floyd Death: अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लष्कर उतरवू, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा)
सेंट लुइस शहरामध्ये आंदोलनादरम्यान काही नागरिक दुकांनाची तोडफोड करुन लूटमार करत आहेत. असाच एक चोरीचा प्रयत्न थोपवताना सेंट लुइसचे निवृत्त पोलिस कॅप्टन मारले गेले. जॉर्ज फ्लॉयड या व्यक्तीच्या मृत्यू निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनातील पोलिसांची ही पाचवी हत्या आहे. मिनियापोलिस शहरामध्ये जॉर्ज फ्लॉयड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगभरात हिंसक आणि शांततापूर्वक आंदोलने सुरु आहेत.
ANI Tweet:
Mahatma Gandhi’s statue outside the Indian Embassy in Washington DC desecrated by unruly elements of #BlackLivesMatter protesters. Sources tell ANI that United States Park Police have launched an investigation, more details awaited. pic.twitter.com/jxRpIhqd2W
— ANI (@ANI) June 4, 2020
46 वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडला अमेरिकेचे श्वेतवर्णीय पोलिस अधिकारी डेरेक चौविन यांनी अटक करताना मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या माहितीनंतर पूर्ण अमेरिकेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले आहेत.