अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी आंदोलकांना इशारा दिला आहे. ट्रम्प यंनी रोज गार्डनसोबत बोलताना म्हटले आहे की, वॉशिंग्टन डीसी (Washington, D.C) मध्ये जे झाले ते अत्यंत खेदजनक होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रभर कर्फ्यू लावण्यात येईल. तरीही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर, मोठ्या प्रमाणावर लष्कर बोलवावे लागेल. अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) नामक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ उसळला आहे. ज्याचे रुपांतर मोठ्या आंदोलनात झाले आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे पहिले कर्तव्य आहे की, अमेरिकेतील नागरिकांचे रक्षण करणे. मी देशात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवेण अशी शपथ घेतली आहे आणि मी तेच करेण असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. (हेही वाचा,George Floyd च्या मृत्युनंतर अमेरिकेत उफाळला हिंसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू, लंडन, बर्लिन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये उमटले पडसाद )
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कायदा तोडणाऱ्यांना अटक केली जाईल. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कावाई करत खटला दाखल करण्यात येईल. ट्रम्प यांनी एका संघटनेचा उल्लेख करत म्हटले की, संबंधित संघटनेला दहशत पसरवणे आणि इतर दोषींना दंड आणि कडक शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. पुढे बोलताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, लूटमार, विस्कळीत जनजीवन, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान यापासून देशाला वाचविण्यासाठी सशस्त्र लष्कराला आणि जवानांना पाचारन करावे लागेल.
ट्रम्प यांनी म्हटले की दंगा, लूटमार, अराजकता आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान यांपासून देशाला वाचविण्यासाठी आम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व संसाधन आणि लष्कराला एकत्र करुन कायद्याचे पालन करणाऱ्या अमेरिकी अधिकाऱ्यांचे संरक्षण केले जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.