भारतामध्ये आज नव्या कृषी कायद्यांचा (Farm Law) विरोध करण्यासाठी शेतकर्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केले होते. दरम्यान सकाळी नियोजित वेळेच्या आधीच ट्रॅक्टर रॅलीला (Kisan Tractor Rally) सुरूवात करून 3 बॉर्डर वरून शेतकर्यांनी दिल्ली कडे कूच करण्यास सुरूवात केली. दरम्यान काही वेळापूर्वी हे आंदोलक शेतकरी दिल्लीत लाल किल्ल्यावर (Red Fort) पोहचले आहेत. तेथे काही जणांनी किल्ल्यावर आपले झेंडे रोवले आहेत. या ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलिस आणि आंदोलक शेतकर्यांचा तीव्र संघर्षदेखील पहायला मिळाला आहे. त्यामुळे शांतता पूर्वक रॅलीचं आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे.
मागील 62 दिवसांपासून सिंधू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत होते. सरकार सोबत 11 फेर्यांमध्ये चर्चा होऊनदेखील ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशामध्येच आज काही हिंसक घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे या हिंसाचाराला जबाबदार असलेले नेमके कोण होते? आंदोलक की हुल्लडबाज? असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. शेतकरी नेत्यांकडून हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या संघटना आमच्या नव्हत्या असं देखील म्हटलं जात आहे. अनेक आंदोलक शेतकर्यांनी पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाने लाल किल्ला गाठला आहे. दरम्यान रस्त्यांत बॅरिकेटिंग, बस यांना तुडवत ट्र्क्टर पुढे गेल्याचं देखील पहायला मिळालंं आहे. Farmers Tractor Rally: मेट्रोलाईन बंद, लाठीचार्ज, अश्रुधूर, शेतकरी-दिल्ली पोलीस झटापट; शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना.
Delhi: Flags installed by protestors continue to fly at Red Fort. #FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/U0SZnTw4Wn
— ANI (@ANI) January 26, 2021
लाल किल्ल्यावर झेंडा
#WATCH A protestor hoists a flag from the ramparts of the Red Fort in Delhi#FarmLaws #RepublicDay pic.twitter.com/Mn6oeGLrxJ
— ANI (@ANI) January 26, 2021
सेंट्रल दिल्लीमध्ये आज जेव्हा पोलिसांकडून शेतकर्यांना रोखण्यात आलं तेव्हा त्यांनी दगडफेक केल्याचा, पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रकार झाला आहे. पोलिसांनी देखील आंदोलकांना रोखण्यासाठी टिअर गॅस देखील फोडण्यात आला.