Farmers Tractor Rally: मेट्रोलाईन बंद, लाठीचार्ज, अश्रुधूर, शेतकरी-दिल्ली पोलीस झटापट; शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना
Farmers Tractor Rally | (Photo Credit: ANI)

Tractor Parade On Indian Republic Day 2021: केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे (Farm Laws 2020) मागे घेतले जावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी (Farmers Protest) बसलेले शेतकरी ट्रॅक्टर घेऊन राजधानीत पोहोचत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी आगोदरच केला होता. पूर्वनियोजनानुसार शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढलीही. परंतू, काही ठिकाणी दिल्ली पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. त्यातून काही ठिकाणी अनुचीत घटना घडल्या आहेत. सध्यास्थिती पाहता परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोलाईनची काही स्टेशन्स बंद करण्यात आली आहत. काही ठिकाणी लाठीचार्ज तर काही ठिकाणी अश्रुधूराचा वापर करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात काही ठिकाणी झटापटही झाल्याचे वृत्त आहे. शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यानच्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घटना.

 दिल्ली मेट्रो काही काळासाठी बंद

शेतकरी ट्रॅक्टर रॅली आणि दरम्यान झालेल्या गदारोळामुळे दिल्ली मेट्रो काही काळासाठी बंद. समयपुर बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपुर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आजादपुर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विश्वविद्यालय, विधानसभा आणि सिविल लाइन्स मेट्रोचे प्रवेश द्वारा आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद.  ग्रीन लाईन मेट्रोचे एण्ट्री आणि एक्जिट गेट बंद आयटीओ येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीमार. ग्रीन लाईन मेट्रोचे एण्ट्री आणि एक्जिट गेट बंद. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे एण्ट्री आणि एक्झिट गेट बंद. (हेही वाचा, Tractor Accident During Farmer's Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ)

 शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यात जोरदार झटापट

दिल्ली ITO येथे शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यात जोरदार झटापट. आक्रमक शेतकऱ्यांकडून पोलिसांचे वाहन हायजॅक केल्याचे वृत्त. ITO ते लालकिला मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात.

नोएडा आणि चिल्ला बॉर्डर शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट. गाजीपूर बॉर्डरजवळ शेतकऱ्यांनी पोलिसांनी रस्त्यावर लावलेली बॅरीकेट्स हटवली. काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटना. काही ट्रक आणि गाड्यांची तोडफोड झाल्याचे वृत्त. शेतकरी मोठ्या प्रमाणावर दिल्लीच्या दिशेने. काही पोलीस जखमी. शेतकरीही जखमी. शेतकरी ISBT मार्गावरुन पुढे सरकात आहेत. काही ठिकाणी धक्काबुक्की.