ओसामा बिन लादेन ,हमजा बिन लादेन (Photo Credits: Twitter)

कुख्यात दहशतवादी संघटना अल- कायदा (AL- Qaeda) आणि ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) याचा उत्तराधिकारी मुलगा हमजा बिन लादेन (Hamza Bin Laden) याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. याविषयी स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी माहिती दिली. अफगाणिस्थान (Afghanistan) आणि पाकिस्तान (Pakistan) च्या सीमेवर अमेरिकेने दहशवाद विरुद्ध हल्ला केला यामध्ये हमझा बिन याचा अंत झाला. प्राप्त माहितीनुसार काही वेळापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस (White House) मधून याविषयी अधिकृत विधान कारण्यात आले. यामुळे येत्या काळात अल- कायदा संघटनेसाठी नेतृत्व उरणार नाही परिणामी या संघटनेच्या कुख्यात कारवायांचे सुद्धा खच्चीकरण होईल असेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.

वास्तविक ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकन माध्यमांनी याविषयी वृत्त दिले होते. यानुसार युनाइटेड स्टेट्स चा सहभाग असलेल्या दहशवाद विरुद्ध हल्ल्यात मागील दोन वर्षातच हमझा बिन लादेन याचा अंत झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच मागील महिन्यात संरक्षण दलाचे सचिव मार्क एस्पेर यांनी सुद्धा याविषयी पुष्टी केली केली होती. मात्र यासंदर्भात ट्रम्प किंवा अन्य अधिकाऱ्यांतर्फे  कोणतीही सार्वजनिक घोषणा झाली नव्हती.

ANI ट्विट

हजाम बिन लादेन हा साधारण 30 वर्षाचा होता. ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतर 'अल-कायदा'ची सूत्रे हमजाच्या हाती आली होती. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.