Mumbai to Singapore Flight (Photo Credits: ANI)

मुंबईहून सिंगापुरला (Singapore) जाणार्‍या एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये मंगळवारी बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे (bomb hoax )काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बॉम्ब असल्याची माहिती समजातच फ्लाईट चांगी विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे विमान सिंगापुर एअरलाईन्सचं  (Singapore Airlines)असून पायलटने त्याचे इमरजन्सी लॅन्डिंग केलं असून प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

ANI ट्विट 

सिंगापुर एअरलाईन्सचं फ्लाईट 423 मुंबईकडून सिंगापुरकडे झेपावलं. थोड्याच वेळात त्यामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पायलटने तात्काळ त्यांचं इमरजन्सी लॅंडिंग केलं. बॉम्ब असल्याची केवळ अफवा असल्याचं समजल्यानंतर सार्‍यांचा जीव भांड्यात पडला. या विमानामध्ये 263 प्रवासी होते.

बॉम्ब असल्याचं वृत्त समजताच पायलटला तात्काळ अलर्ट करण्यात आलं. त्यानंतर एस क्यू फ्लाईट 423ला सिंगापुरच्या वायुसेनेकडून सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. त्यनंतर विमानाची तपासणी झाली. विमानात कोणतीच संदिग्ध वस्तू आढळली नाही.