
मोदी सरकारने कलम 370 जम्मू-कश्मीर मधून रद्द केल्याने पाकिस्तानची (Pakistan) जळफळाट अद्याप सुरुच आहे. यामुळे पाकिस्तानने प्रथम भारतासोबतचे राजकियसंबंधासह अन्य संबंध तोडत असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भारतीय जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्यलेटरी अथॉरिटी (PEMRA) यांनी याबद्दल एक पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये हा मुद्दा मांडला आहे. त्यानुसार जाहीर केलेल्या पत्रकात भारतीय कलाकारांना पाहून पाकिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानने भारता विरुद्ध घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना जबरदस्त फटका बसला आहे.(कलम 370 हटवल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर घातली बंदी)
तसेच भारत-पाकिस्तान या दोन देशांत आंतरराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या मीठाईची देवाण-घेवाण सुद्धा बंद केली आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान पंतप्रधान इमारान खान सुद्धा मोदी सरकारच्या निर्णयावरुन संतप्त झाले असून सरळ युद्धाचे शब्द बोलून दाखवत आहेत.