जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) संतापला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व राजकीय, व्यापार आणि समझौता एक्सप्रेसवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या सरकराने भारतीय चित्रपटांवर त्यांच्या देशात बंदी घातली आहे.
पाकिस्तान पंतप्रधानमंत्री यांचे विशेष सूचना सलाहागार फिरदौस आशिक अवान यांनी असे म्हटले आहे की, भारतीय चित्रपट पाकिस्तानात यापुढे दाखवले जाणार नाहीत. तसेच भारतीय परंपरेचे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ सुद्धा एका पॉलिसीअंतर्गत दाखवता येणार नाहीत. मात्र पाकिस्तानकडून कश्मीर वासियांना पाठिंबा मिळणार आहे.(कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सुरु केले घाणेरडे राजकारण; मुद्दाम थांबवली समझौता एक्सप्रेस)
याच वर्षी जम्मू-कश्मीर मध्ये झालेल्या घटनांवरुन भारतीय चित्रपट निर्मात्यांनी स्वत:हून पाकिस्तान मध्ये चित्रपट दाखवायचे नाही असा निर्णय घेतला होता. तसेच काही निर्मात्यांनी पाकिस्तानमध्ये चित्रपटाचे प्रदर्शनसुद्धा करणार नाही असे म्हटले होते. बालकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान कलाकारांवरही भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील कलाकारसुद्धा संतप्त झाले आहेत.आतिफ असलम, माहिरा खान यांच्यासारख्या कलाकारांनी कश्मीर हा आता भारताचा भाग होणार असल्याने वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियात केले आहे.