प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार सातत्याने महिलांच्या बाबत नवेनवे निर्णय घेत आहे. अशातच आता काबुलमध्ये आदेश दिला गेला आहे की, महिलांनी घरीच रहावे. जर पुरुष मंडळी कामे करु शकतात तर महिलांची त्यासाठी गरज नाही. काबुलच्या महापौरांद्वारे असे म्हटले आहे की, जी काम पुरुष मंडळी करु शकत नाहीत तिच काम फक्त महिलांना करण्यास परवानगी आहे. काबुलच्या महापौरांनी पुढे असे म्हटले की, ज्या पदांवर महिला होत्या त्या जागी आता पुरुष मंडळी काम करु शकतात. तो पर्यंत महिलांना घरीच थांबावे लागणार आहे.  परिस्थिती सामान्य होत नाही तो पर्यंत असेच सुरु राहणार आहे. याच दरम्यान महिलांना पगार सुद्धा दिला जाणार आहे.

तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये असे काही निर्णय घेण्यात आले जे महिलांच्या विरोधात आहेत. यामध्ये महिलांना काम करण्यापासून ते शिक्षणाबद्दल ही  नियम लागू करण्यात आले आहेत. तर मुल आणि मुलांना एकत्रितपणे वर्गात बसता येणार नाही असे जाहीर केले होते.(Afghanistan Blast: अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये बाँम्बस्फोट, स्फोटात 3 जण ठार तर 20 लोक जखमी)

Tweet:

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी आपली सत्ता स्थापन करुन एक महिना उलटून गेला आहे. तरीही तेथे अद्याप अंतरिम सरकारच्या माध्यमातून सरकार चालवले जात आहे. काबुलवर जेव्हा ताबा मिळवला गेला तेव्हा प्रथमच पत्रकार परिषद घेत त्यांनी महिलांना सरकारमध्ये स्थान दिले जाईल असे म्हटले होते. मात्र अंतरिम सरकारमध्ये सर्व मंत्री हे पुरुषच आहेत. या व्यतिरिक्त काबुलसह अन्य शहरातील रस्त्यांवर तालिबानी मुलांनी महिलांवर केलेल्या हल्ल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. जगातील काही देशांनी तालिबानी सरकारने महिलांना त्यांचे हक्क द्यावे असे अपील केले आहे.