Photo Credit- X

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये चिन्मय दास (Chinmoy Krishna Das)यांना अटक झाल्यानंतर त्यांचा खटला लढणारे वकील रमन रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. रमण रॉय(Advocate Raman Roy Attacked) यांच्यावर हा हल्ला त्यांच्या चट्टोग्राम येथील घरी करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या घराची तोडफोड तर केली. यात ते गंभीर जखमीही झाले. वकील रमन रॉय यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी 2 भिक्षूंना अटक; आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात)

कोलकाता इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'रमन रॉय यांचा एकच ‘दोष’ होता की ते न्यायालयात इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांचा बचाव करत होते. इस्लामवाद्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. कृपया ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.” (Chinmoy Krishna Das Prabhu Arrest: ढाका पोलिसांनी चिन्मय दासला ताब्यात घेतलं, हिंदूंमध्ये संताप, इस्कॉननं केलं पंतप्रधान मोदींना आवाहन)

चिन्मय दासची अटक आणि हिंदूंवर हल्ले

इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णा दास यांना नुकतेच बांगलादेश पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचे आणि हिंदूंचे संघटन केल्याचा आरोप आहे. त्याच्या अटकेपासून बांगलादेशात हिंदू समाजावर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. ताज्याघटनेत चिन्मय कृष्णा दास यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चट्टोग्राममध्ये हिंसाचार उसळला होता.

इस्कॉनवर सरकारी कारवाई

बांगलादेशमध्ये इस्कॉनविरोधातील सरकारी कारवाई तीव्र झाली आहे. अधिकाऱ्यांनी इस्कॉनच्या 17 प्रमुख सदस्यांची बँक खाती 30 दिवसांसाठी गोठवली आहेत. याशिवाय संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

आक्रोश आणि चिंता

या घटनेनंतर हिंदूंमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना पूर्वीपासूनच घडत आहेत. आता वकील रामेन रॉय यांच्यावरील हल्ल्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. ही बाब केवळ बांगलादेशमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनली आहे. इस्कॉन सदस्य आणि हिंदू संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून बांगलादेश सरकारकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.