दक्षिणपूर्व आशियाई देश इंडोनेशियातील (Indonesia) सुलावेसी बेटावर (Sulawesi Island) गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपाने (Earthquake) सर्वांनाच हादरून सोडले आहे. या भूकंपात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 700 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी असून यात शेकडो घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे सात सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, अनेकजण ढिगाराखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे मृतांच्या आकड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भूकंपामुळे आणखी हादरे बसू शकतात असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे त्सुनामीचा धोका वाढू शकतो.
या भूकंपाचे केंद्र पश्चिम सुलावेसी प्रातांतील मामुजु जिल्ह्यात जमिनीखाली 18 किमी खोल अंतरावर होते. या भागात समुद्रात 6.2 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. शुक्रवारी आलेल्या भूकंपात जवळपास शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूकंपाचे आफ्टरशॉक्सही जाणवण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Mob Demolishes Hindu Temple in Pakistan: पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक मंदिरावर हल्ला, 14 जणांना अटक; खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील घटना
एएनआयचे ट्वीट-
Indonesia: Death toll from earthquake rises to 35
Read @ANI Story | https://t.co/50hPj2e2rh pic.twitter.com/PCGtyKPDuV
— ANI Digital (@ani_digital) January 15, 2021
या भूकंपामध्ये जखमी आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य जोमाने सुरू आहेत. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपात एका रुग्णालयाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे तंबू उभारून नागरिकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जवळपास 15 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.