Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Indian Student Dies In US: फ्लोरिडा (Florida) मध्ये एका वेगवान कारने धडक दिल्याने अमेरिकन विद्यापीठात शिकणाऱ्या एका तेलंगणाच्या महिलेचा मृत्यू झाला. तेलंगणातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील 25 वर्षीय विद्यार्थ्याचा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला. फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या गुंतीपल्ली सौम्या या 26 मे रोजी रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

सौम्या किराणा सामान खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. रिपोर्ट्सनुसार, ती पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. (हेही वाचा -Indian Student Dies In US: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; 2024 मध्ये आतापर्यंत 11 हून अधिक विद्यार्थ्यांनी गमावला जीव)

प्राप्त माहितीनुसार, मूळची भोंगीर जिल्ह्यातील यादग्रीपल्ली येथील सौम्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. रिपोर्ट्सनुसार, तिने फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स पूर्ण केले होते. ती नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. सौम्याच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. एका वृत्तानुसार, तिचे आई-वडील कोटेश्वर राव आणि बालामणी यांनी तिचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन केले आहे. (हेही वाचा -Indian Student Dies of Cardiac Arrest: कॅनडात 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मुलाचा मृतदेह आणण्यासाठी कुटुंबियांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र)

तेलंगणाचे मंत्री कोमातिरेड्डी वेंकट रेड्डी यांनी सौम्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांचे पार्थिव परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत आतापर्यंत अमेरिकेत 11 भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.