फिलीपिन्समध्ये (Philippines) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने महिलेचं शिर धडावेगळ करून नंतर तिचा मेंदू काढून खाल्ला आहे. (21 Year Old Man Eats Woman Brain) या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण फिलीपिन्स शहरामध्ये खळबळ उडाली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी गुरुवारी Lloyd Bagtong नावाच्या 21 वर्षीय तरूणाला एका अज्ञात महिलेल्या हत्येच्या संशयावरून अटक केली होती. दरम्यान, पोलिसांना या तरुणाच्या घरापासून काही अंतरावर महिलेचे काही अवयव सापडले. या हत्येविषयी सांगताना आरोपीने सांगितले की, 'महिलेची हत्या करताना मी नशेत होतो. तसेच मला भूक लागली होती. ती महिला इंग्रजीमध्ये काहीतरी बोलत होती. परंतु, मला ती काय बोलतेय ते कळत नव्हतं.' (हेही वाचा - बलात्कार करणाऱ्या दोषीला जगातील 'या' देशात आहेत कठोर शिक्षा; पाहा काय आहे शिक्षेचं स्वरूप)
लॉयड हा बेरोजगार तरुण आहे. प्राथमिक अंदाजानुसार, लॉयडने महिलेची हत्या केली. त्यानंतर मोठ्या चाकूने तिचं शिर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर हे शिर एका कापडात गुंडाळून घरी नेले. लॉयडने पोलिसांनी सांगितले की, त्याने घरी गेल्यावर भात बनवला. त्यानंतर महिलेचा मेंदू त्यावर ठेवून खाल्ला. त्यानंतर त्याने घराजवळील एका खड्ड्यात महिलेचं शिर फेकून दिलं. पोलिसांना ज्यावेळी या महिलेचा मृतदेह सापडला त्यावेळी तिच्या अंगावर केवळ जीन्स होती. तरुणाच्या घराच्या परिसरात मृत महिलेचे रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत.
पोलिसांच्या अंदाजानुसार, आरोपीने या कपड्याच महिलेचं शिर घरी आणलं असावं. अद्याप पोलिसांना मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तसेच आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं आहे.