Countries Having Brutal Punishments Against Rape: दिल्ली, कठुआ आणि आता हैदराबाद, भारतात होणाऱ्या रेप केसेस जसजशा वाढताना दिसत आहेत. त्याचसोबत बलात्कार होण्याची प्रत्येक घटना ही तितकीच बीभत्स आहे. अशा बलात्कार करणाऱ्यांवर वेळेत का कारवाई केली जात नाही असा सवाल देशातील जनतेच्या मनात असताना, हैदराबाद पोलिसांनी मात्र त्याला ठोस उत्तर दिलं आहे ते त्यांच्या कृतीतून. हैदराबाद मध्ये झालेल्या बलात्कार (Hyderabad Rape Case) प्रकरणात दोषी असलेल्या चारही आरोपींना आज हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर (Hyderabad Police Encounter) करत ठार केले आहे. हैदराबाद पोलिसांचं देशभर कौतुक होत असलं तरी या कृत्याला अनेक स्तरावरून विरोध देखील दर्शवण्यात येत आहे. पण खरंच आपल्या देशात बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध कडक शासन आहे का? अल्पयीन मुलींवर किंवा महिलांवर बलात्कार केल्यास इतर देशात काय शिक्षा असते? आणि कोणत्या देशाचा या संबंधित कायदा सर्वात जास्त कठोर आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
भारतात काय शिक्षा?
भारतात बलात्कार करणाऱ्या दोषीला जन्मठेपेची शिक्षा (जे प्रत्यक्षात 14 वर्षे आहे), संपूर्ण आयुष्याची तुरूंगवासाची शिक्षा आणि अगदी दुर्मिळ प्रकरणात मृत्यूदंड ठोठावली जाते. यात बलात्कारासोबतच इतर अनेक प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा समावेश देखील करण्यात आला आहे.
चीन
बलात्कार करणार्याला सरळ मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा मध्ये चीनमध्ये आहे. काही केसेसमध्ये बलात्कार करणार्यांवर कॅस्ट्रेशन देखील करण्यात येते.
इराण
इराणमध्ये असे म्हणतात की बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्यात येते किंवा सार्वजनिक ठिकाणी नेऊन ठार मारण्यात येते. कधीकधी, दोषी पीडित व्यक्तीच्या परवानगीने फाशीच्या शिक्षेपासून सुटू देखील शकतो परंतु तरीही 100 फटके किंवा जन्मठेपेची शिक्षा त्याला भोगावीच लागते.
नेदरलँड
अगदी संमतीशिवाय किस घेण्यासह कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला नेदरलँडमध्ये बलात्कार मानले जाते. बलात्कार करणार्याला दोषीला वयानुसार 4 ते 15 वर्षे कारावासाची शिक्षा दिली जाते. नेदरलँडमध्ये एखाद्या वेश्यावरील लैंगिक अत्याचारालाही 4 वर्षे कारावास भोगावा लागतो.
फ्रान्स
फ्रान्समध्ये, बलात्कार करणाऱ्यास 15 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते आणि पीडितेने मागणी केल्यास शिक्षेचा कालावधी वाढवून 30 वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
अफगाणिस्तान
बलात्कार करणाऱ्या दोषीच्या डोक्यात गोळी घालून अफगाणिस्तानात पीडित मुलीला अवघ्या चार दिवसांत न्याय दिला जातो.
उत्तर कोरिया
उत्तर कोरियाकडे बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी कसलीही माफी नाही. एका विशेष पथकाद्वारे बलात्कार पीडितेस त्वरित न्याय दिला जातो. त्यासाठी बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला डोक्यात गोळ्या घालून ठार करण्यात येते.