Pay and Stay University Visa Scam: अमेरिकेमध्ये “pay to stay” रॅकेट उघड झाले आहे. यामध्ये काही भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश आहे. इमीग्रेशन नियमांचे (Immigration Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी 600 भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते. आता 129 भारतीय विद्यार्थ्याची चौकशी करण्यात येत आहे तर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्याची गैरसोय टाळून त्यांच्या मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासात (Indian Embassy US) खास 24/7 हॉटलाईन (hotline) सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. अमेरिकेतील या धाडसत्रामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Immigration नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत 600 भारतीय विद्यार्थी ताब्यात
24X7 Helpline for Indian Students @meaindia @CGI_Atlanta @IndiainChicago @cgihou @IndiainNewYork @CGISFO @harshvshringla @HarshShringla pic.twitter.com/qd2gCqVR0l
— India in USA (@IndianEmbassyUS) February 1, 2019
डेट्रोइड (Greater Detroit) येथील फ्रेमिंगचन हिल्स (Farmington University) भागात बनावट विद्यापीठाची उभारणी करून विद्यार्थी व्हिसावर काही परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी व्हिसा दर्जा कायम ठेवत अमेरिकेत राहता यावं यासाठी बोगस विद्यापीठात प्रवेश घेतला होता. स्थलांतर व सीमा शुल्क संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी छापे टाकून विद्यार्थ्याना ताब्यात घेतले आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) कडून ही कारवाई करण्यात आली आहे. Australian Spouse Visa मिळवण्यासाठी बहीण भावाने बांधली लग्नगाठ, कारवाईच्या भीतीने दोघेही फरार
अमेरिकेतील न्यूजर्सी, अॅटलांटा, ह्य़ूस्टन, मिशीगन, कॅलिफोर्निया, लुईझियाना, नॉर्थ कॅरोलिना , सेंट लुईस येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन अटक करण्यात आली. 2016 साली देखील अशाप्रकारे University of Northern New Jersey या बनावट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशाच्या बहाण्याने आलेल्यांवर कारवाई करण्यात आली होती.