अमेरिकेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इमीग्रेशन नियमांचे (Immigration Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी 600 भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. इमीग्रेशन एजेंसीने छापा मारत या विद्यार्थ्यांना पकडले आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि इमीग्रेशन एजेंसीने आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी एका अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 600 हून अधिक विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रे नसतानाही अमेरिकेत राहण्यास मदत करणाऱ्या आठ लोकांना देखील पकडण्यात आले आहे.
फ्रेमिंगचन हिल्स भागात बनावट विद्यापीठाची उभारणी करण्यात आली असून त्यात परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. याप्रकरणी अमेरिकन तेलगू असोसिएशन (एटीई) सर्व प्रकारची मदत करत आहे. एटीई ने सांगितले की, "600 विद्यार्थ्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले असून 100 हून अधिक विद्यार्थी फर्मिंग्टन युनिव्हर्सिटीतील आहेत."
अमेरिकन तेलगू संघटनेने भारतीय राजदूत हर्षवर्धन सिंघला यांनी कॉन्स्युलेट जनरल डॉ. स्वाती विजय कुलकर्णी यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी ते स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क साधत आहेत. अमेरिकन तेलगू संघटनेचे प्रमुख परमेश भीमरेड्डी यांनी याप्रकरणी दूतावासाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
फेक युनिव्हर्सिटी आणि अशा प्रकराच्या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी लांब राहण्याचा सल्ला परमेश भीमरेड्डी यांनी दिला आहे. तसंच इमीग्रेशन संदर्भातील नियम आणि त्यांचे उल्लंघन याचीही माहिती तेलगू असोसिएशनतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
आजकाल शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा तरुणाईचा कल वाढताना दिसत आहे. अशावेळी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता, त्यांच नियम याची संपूर्ण माहिती करुन घेणे गरजेचे आहे.