मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती.या पार्श्वभूमीवर दहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी ट्विट करुन दिली आहे.