Students | Twitter

महाराष्ट्र बोर्डाकडून आज 5 मे दिवशी बारावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result) जाहीर करण्यात आला आहे. सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांचा निकाल आज बोर्डाने जाहीर केला असून राज्याचा बारावीचा निकाल 91.88% लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.49% कमी लागला आहे. पण यामागे कॉपीमुक्त परीक्षा अभियान असल्याने हा निकाल कमी झाला असावा असे बोर्डाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. पण बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या (SSC Result)  विद्यार्थ्यांमध्येही निकालाची उत्सुकता वाढली आहे. यंदा बोर्डाने 15 मे पूर्वी बोर्ड 10वी-12वी चे निकाल जाहीर करणार असे सांगितल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?

दहावीचा निकाल कधी लागणार?

बारावी पाठोपाठ राज्य शिक्षण मंडळ दरवर्षी आठवडाभरात दहावीचा देखील निकाल जाहीर करतात. त्यामुळे आता  12-15 मे दरम्यान बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 21 मे आणि दहावीचा निकाल 27 मे दिवशी लागला होता. 2023 मध्ये 2 जूनला दहावीचा निकाल लागला होता तर 12 वीचा निकाल 25 मे दिवशी लागला होता. SSC Result Pass Prediction: मुलांच्या तुलनेत मुली सरस, महाराष्ट्र एसएससी निकालाचा ट्रेंड; पाठिमागील 5 वर्षांतील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी, घ्या जाणून .

कसा पहाल दहावीचा निकाल ऑनलाईन?

  • बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
  • होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि आईचं नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

यंदा दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत. अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही पण बारावी प्रमाणेच दहावीच्या निकालाची तारीख देखील एक दिवस आधी जाहीर केली जाईल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाईव्ह प्रमाणे निकाल दाखवला जातो.