राजस्थान येथील क्रूर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये जोधपूरमध्ये एका डॉक्‍टरने कुत्र्याला कारला बांधून पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. डॉक्‍टरच्‍या घरात तो कुत्रा घुसला होता, यामुळे रागात डॉक्‍टरने असे केले असल्याचे समोर आले आहे.