मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका कुत्र्याने कार चालकाचा लागलेला धक्क्याचा त्याने घेतलेला बदला चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान ही घटना मध्य प्रदेश मधील सागर जिल्ह्यातील आहे. कार चालकाने कुत्र्याच्या शेपटीवरून गाडी नेल्याने त्यानेही गाडीवर खोल ओरखडे काढत नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सागर (Sagar) मधील तिरूपती पुरम कॉलनी (Tirupati Puram Colony) मधील आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेशातील ही घटना 17 जानेवारीची आहे. कारचालक Prahlad Singh Ghoshi गाडी चालवत असताना एका यू टर्न वर कार रस्त्यात बसलेल्या कुत्र्याच्या शेपटीवरून गेली. प्रल्हाद त्याच्या कुटुंबासोबत एका लग्नाला जात होता. यावेळी कुत्र्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तो कुत्रा या प्रकाराने रागात होता. गाडी जाईपर्यंत तो भुंकत होता. मात्र रात्री 2 च्या सुमारास जेव्हा गाडी पुन्हा आली तेव्हा त्याने गाडी ओळखली आणि आपला बदला घेतला.
#WATCH | Revenge Caught On CCTV: Dog Scratches Car Bonnet After Being Hit By Car Owner In Sagar#MadhyaPradesh #MPNews #Dog pic.twitter.com/2ucSvbY8sA
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) January 21, 2025
गाडीचा मालक घरात गेल्यानंतर तो कुत्रा गाडीवर चढला. त्याने बोनेट वर खोल ओरखडे काढले. ही गाडी काळ्या रंगाची i20 होती. गाडीच्या मालकाला सुरूवातीला हा प्रकार काही टवाळ मुलांनी दगडाने केला असावा असं वाटलं होतं. पण कुत्र्याने ओरखडे काढल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. हा प्रकार पाहून सारे आवाक झाले आहेत. सध्या कुत्र्याने ओरखडे काढल्याचं सीसीटीव्ही फूटेजदेखील वायरल होत आहे.