Photo Credit- X

Rajasthan Shocker: शाळाही विद्येचे मंदीर आहे. मात्र शाळेत देखील मुली सुरूक्षित नसल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात एका 15 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील शिक्षकाने बलात्कार (Minor Girl Raped) केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली असून शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(UP: निर्दयी आईने नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात, कुत्र्यांनी कुरतडल्यामुळे बाळाचा मृत्यू)

शनिवारी घडली घटना

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना दंतारामगड येथे घडली. जिथे आरोपी सरकारी शाळेतील शिक्षकाने मुलीला त्याच्या खोलीत नेले आणि पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मुलीला तिच्या घरी सोडून पळून गेल्याचे त्याने सांगितले.(Assam Child Marriage: बालविवाह प्रकरण तापले, असममध्ये तिन टप्प्यांत 416 जणांना अटक, 300 हून अधिक गुन्ह्यांची नोंद)

पीडितेची वैद्यकीय तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी रविवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेला सोमवारी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सिंह म्हणाले.