Crab and Puppy Viral Video: अनेकजण कुत्रा-मांजर यांसारखे प्राणी आपल्या घरात पाळतात आणि त्यांच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, तर प्राण्यांमधील मैत्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. त्यांच्यात प्रेम आणि मैत्रीचे अतूट बंध पाहायला मिळतात, जे लोकांना पाहायलाही आवडते. दरम्यान, सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याचं खेकड्यासोबत बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या या दोन प्राण्यांमधील मैत्री पाहून अनेकांना आनंद होत आहे, तर अनेकांना आश्चर्य वाटले असून याला आतापर्यंतची सर्वात विचित्र मैत्रीचा बंध म्हणत आहे. हा व्हिडिओ lingting.china नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले - आजवरची सर्वात विचित्र मैत्री, तर दुसऱ्या यूजरने लिहिले - हे पिल्लू खूप क्यूट आहे, तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे - त्यांच्यामध्ये खूप मैत्री असल्याचे दिसते. दुसरीकडे, अनेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, पिल्लू खेकड्याच्या तावडीत अडकले आहे.
येथे पाहा, व्हिडीओ:
View this post on Instagram
खेकडा आणि गोंडस पिल्लू यांच्यात मैत्री
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गोंडस पांढऱ्या रंगाचे पिल्लू त्याच्या खेकडा मित्रासोबत दिसत आहे. पिल्लू आपल्या मित्र खेकड्यासोबत सावलीत आरामात बसले आहे. दोघांमधील ही मैत्री पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.अनेक लोक या मैत्रीचे कौतुक करत आहेत, तर अनेकजण पिल्लू आणि खेकडा यांच्यातील मैत्रीला अशक्य म्हणत आहेत.