बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री जॅकलीनला ईडीने 14 सप्टेंबरला चौकशीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची काल ८ तास चौकशी केली.