
Nora Fatehi Death Viral Video Fact Check: सोशल मीडीया मध्ये एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बंजी जम्पिंग करताना कोसळ्याचं दिसत आहे. या वायरल बाबत दावा केला जात आहे की तो व्हिडिओ अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) आहे. या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. दरम्यान हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
वायरल व्हिडिओ चं सत्य घ्या जाणून
सोशल मीडीया मध्ये अनेक युजर्स हा दावा शेअर करत आहेत की नोरा फतेहीचा बंजी जम्पिंग दरम्यान पडून मृत्यू झाला. या व्हिडिओ कडे नीट पाहिल्यास ही महिला सुरक्षित असल्याचं दिसत आहे. यामधील महिला सेफ्टी रोप सोबत बांधलेली आहे. हा कोणता अपघात नसून बंजी जम्पिंग दरम्यानच सामान्य अॅक्टिव्हिटी आहे.
नोरा फतेही च्या टीमने अभिनेत्री सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तिचा कोणताही अपघात झालेला नाही. सध्या नोरा सोशल मीडीयात अॅक्टिव्हही आहे ज्यामुळे ती ठीक असल्याचं समजते.
एखाद्या सेलिब्रिटीबद्दल अशा खोट्या बातम्या पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अफवा इंटरनेटवर झपाट्याने पसरतात आणि अनेक वेळा लोक त्या तपासल्याशिवाय सत्य म्हणून स्वीकारतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे फार महत्वाचे आहे.
नोरा फतेहीच्या निधनाची बातमी पूर्णपणे खोटी आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दुसरीच असून ती सुरक्षित आहे. सोशल मीडियावर कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा आणि भ्रामक अफवा टाळा.