भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला आहे. अमृत महोत्सवनिमित्त जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित वर्ल्ड ट्रेड सेंटरने 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या स्मरणार्थ भारतीय तिरंगा प्रदर्शित केला.