Independence Day 2024 | File Image

भारताचा यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) 15 ऑगस्टला साजरा होणार आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर नागरिक विविध सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन करतात. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे त्यामुळे या दिवशी विविध माध्यमातून आपली देशभक्ती व्यक्त केली जाते मग या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बनवलेली ही खास ग्रिटिंग्स, WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes तुम्ही डाऊनलोड करून शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल. स्वातंत्र्यदिन हा खास दिवस साजरा करताना सकाळी झेंडावंदन केले जाते.

यंदा स्वातंत्र्यदिना निमित्त हर घर तिरंगा ही मोहीम देखील राबवली जात आहे. यानिमित्ताने प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जाणार आहे. मग तुम्ही देखील या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभागी होत स्वातंत्रदिन खास करा. Independence Day 2024 Fancy Dress Ideas for Kids: स्वातंत्र्य दिनाच्या विशेष फॅन्सी ड्रेस स्पर्धांसाठी काही हटके आयडिया, पाहा व्हिडीओ.   

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा फडकवला जातो. तसेच भाषण देऊन देशाला संबोधित केले जाते. यंदा मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्म चा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिना निमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले जाणार आहे.