78th Independence Day | File Image

प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस खास असतो. या दिवशी प्रत्येक भारतीय अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली देशभक्ती व्यक्त करत असतो. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जात आहे. या दिवशी वातावरणामध्ये चैतन्य असते मग या दिवसाचं औचित्य साधत तुम्ही तुमच्या मित्र मंडळींना WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes शेअर करत या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा तुम्ही शेअर करू शकता. 'विकसित भारत' या थीम वर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन होणार आहे.

15 ऑगस्ट 1947 दिवशी भारताची इंग्रजांच्या जुलमी राजवटी मधून सुटका झाली. त्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारत स्वातंत्र्याचा आनंद घेतला आहे. तेव्हापासून दरवर्षी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्याचं स्मरण ठेवून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. नक्की वाचा:  Independence Day 2024 Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यंदा लाल किल्ल्यावरील भाषण कधी, कुठे, कसं बघाल? 

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

 विचारांचं स्वातंत्र्य
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्यदिनी
 सलाम करू या भारतदेशाला

 

 

जगभरात घुमतोय भारताचा नारा
अभिमानाने फडकतोय आकाशात तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो
 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला
78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मोदी सरकार च्या तिसर्‍या टर्म चा यंदा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. यानंतर ते देशातील जनतेला उद्देशून भाषण करणार आहेत.